पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या 'तानपुरा' आकाराच्या पादचारी पुलाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार (दि.१) रोजी करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ (सहकार व नागरी विमान वाहतूक), राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरी मिसाळ (नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय), मा. आ. श्री. सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ), मा. आ. श्री. हेमंत रासने (कसबा विधानसभा मतदारसंघ) उपस्थित होते. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर यांच्यासह महामेट्रो, पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.