Send ‘Hi’
to book your E-Ticket
X

Pune Metro Rail Project

महा मेट्रो बद्दल

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो)

भारत सरकार व महराष्ट्र शासन यांच्या ५०:५० अशा संयुक्त मालकीची महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी तयार करण्यात आली. मुंबई महानगर प्रदेशाच्या बाहेर महाराष्ट्र राज्यातील पुणे मेट्रो रेल प्रकल्प फेज १ सहित सर्व मेट्रो प्रकल्पांच्या सोप्या आणि विनाअडथळा अंलबजावणीसाठी यापूर्वी अस्तित्वात असलेले नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड (एनएमआरसीएल) चे पुनर्निर्माण करून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) या नावे नवी कंपनी तयार करण्यात आली आहे.

मेट्रो रेल्वे प्रकल्प (Construction of Works) कायदा १९७८; मेट्रो रेल्वे (Operation & Maintenance) अॅक्ट २००२; आणि रेल्वे कायदा १९८९ च्या कायदेशीर आराखडयाखाली घेण्यात येईल ज्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत.