31 जाने. 2019
|
#पुणेमेट्रो च्या #रीच१ पीसीएमसी-रेंज हिल येथील फुगेवाडी मेट्रो स्थानकाच्या पहिल्या पातळीसाठी १० पैकी ७ पिअर आर्म्स पूर्ण.
|
28 जाने. 2019
|
महामेट्रो आणि एएफडी, फ्रांस यांच्यामध्ये २ हजार कोटिंचा सामंजस्य करार
|
17 जाने. 2019
|
पुणेमेट्रो च्या रीच१ पीसीएमसी ते रेंजहिल्स साठी एकूण ७७१ सेगमेंट्स चा स्पॅन तयार, १९७ खांब उभे व १२४ खांबांवर कॅप तयार. २५७ खांबांसाठी ठोस पाया तयार.
|
02 जाने. 2019
|
पुणेमेट्रो रीच २ वनाज-सिव्हील कोर्ट येथील १९२ खांबांसाठी ठोस पाया तयार व इतर ठिकाणी उत्खनन चालू, १३१ खांब उभे व ६५ खांबांवर कॅप तयार, एकूण १३२ सेगमेंट्सची उभारणी पूर्ण.
|
17 डिसें. 2018
|
पुणेमेट्रो च्या रीच१ पीसीएमसी- रेंजहिल येथील फुगेवाडी ह्या मेट्रो स्थानकासाठी पियर आर्म बसविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात.
|
13 डिसें. 2018
|
पुणेमेट्रो च्या रिच३ सिव्हिल कोर्ट ते रामवाडी च्या कामाची गती वाढविण्यासाठी एकूण ३ पायलिंग रिग च्या मदतीने खांबांसाठी ठोस पाया तयार करण्यात येत आहे.
|
04 डिसें. 2018
|
पुणेमेट्रो रीच१ पीसीएमसी - रेंजहिल्स साठी १०८३ सेगमेंट्स तयार करण्यात आले.
|
28 नोव्हें. 2018
|
कर्वे रोड येथे रीच २ वनाज ते सिव्हिल कोर्ट साठी एकूण ३६ खांबांसाठी ठोस पाया तयार. २० खांब पूर्ण आणि ७ खांबांवर कॅप तयार.
|
20 नोव्हें. 2018
|
पुणेमेट्रो भाग१ पीसीएमसी - रेंज हिल्स येथील संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकासाठी कॉनकोर्से स्थर वर १० पैकी ७ पिअर आर्म तयार व इतर ३ चे काम वेगाने सुरु.
|
19 नोव्हें. 2018
|
नगर रोड वर पुणेमेट्रो रिच३ सिव्हिल कोर्ट ते रामवाडी मार्गावर रामवाडी येथे भौगोलिक सर्वेक्षणच्या कामाला सुरवात.
|
16 नोव्हें. 2018
|
कर्वे रोड वरील दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
|
13 नोव्हें. 2018
|
पुणेमेट्रो रिच१ साठी फुगेवाडी येथे एकूण १२० सेगमेंट्स चे १२ स्पॅन पूर्ण.
|
06 नोव्हें. 2018
|
१००० वा सेगमेंट बनविण्याचे कार्य नाशिक फाटा येथील कास्टिंग यार्ड येथे यशस्वीपणे पूर्ण.
|
01 नोव्हें. 2018
|
पुणेमेट्रो रिच२ वनाज ते सिव्हिल कोर्ट या मार्गासाठी पौड फाट्याजवळ पूल बांधणीसाठी खांब सुसज्ज. आनंद नगर येथे आकार घेत पूल बांधणी प्रगतीवर. मेट्रो स्थानकाच्या कामासोबत वनाज डेपो जवळ खांब उभारणी वेगात.
|
31 ऑक्टो. 2018
|
पुणेमेट्रो च्या वनाज-सिव्हिल कोर्ट येथील आइडिअल कॉलनी मेट्रो स्थानकासाठी पहिल्या २ पियर आर्मच्या कामाला सुरुवात.
|
22 ऑक्टो. 2018
|
पुणेमेट्रो च्या रिच१ पीसीएमसी-रेंज हिल्स साठी तिसऱ्या लाँचिंग गर्डरची उभारणी पूर्ण. फुगेवाडी येथील सँडविक एशिया लिमिटेड समोर पूलबांधणीसाठी स्पॅन निर्मिती वेगाने सुरु.
|
21 ऑक्टो. 2018
|
पुणेमेट्रो मार्गिका १ पीसीएमसी - रेंजहिल्स साठी नाशिक फाट्या जवळील कास्टिंग यार्ड येथे ९४९ सेगमेंट्स तयार. त्यापैकी ४५९ सेगमेंट्स च्या उपयोगाने पूलबांधणीसाठी ४५ स्पॅन उभारण्यात आले आहे.
|
19 ऑक्टो. 2018
|
मार्गिका २ वनाज-सिव्हील कोर्ट येथील पुणेमेट्रो चे बांधकाम हॉटेल किनारा ते कोथरूड डेपो पर्यंत प्रगतीवर. १४५ खांबांसाठी ठोस पाया तयार व इतर ठिकाणी उत्खनन चालू. ७३ खांब उभे व ३७ खांबांवर कॅप तयार. एकूण ७२ सेगमेंट्सची उभारणी पूर्ण.
|
15 ऑक्टो. 2018
|
पुणेमेट्रो रिच–३ सिव्हील कोर्ट ते रामवाडी या मार्गावरील पहिल्या पाईलचे कार्य पूर्ण.
|
12 ऑक्टो. 2018
|
पुणेमेट्रो च्या भाग१ पीसीएमसी - रेंज हिल्स येथील - संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकासाठी कॉनकोर्से स्थर वर १० पैकी ३ पिअर आर्म पूर्ण.
|
09 ऑक्टो. 2018
|
पुणेमेट्रो रिच३ - सिव्हील कोर्ट ते रामवाडी या मार्गासाठी पुणे रेल्वे स्टेशन, राजा बहादूर मिल रोड ते बंड गार्डन पर्यंत बर्रीकॅडींग करून भौगोलिक सर्वेक्षण प्रगतीवर.
|
28 सप्टें. 2018
|
प्रकल्पाची २ महिन्यांच्या रेकॉर्ड कालावधीत पुणेमेट्रो च्या रिच१ पीसीएमसी-रेंज हिल्स खराळवाडी येथे लौंचिंग गर्डर च्या मदतीने १५ स्पॅन उभारण्यात आले. सोबतच फुगेवाडी येथे पुलासाठी ३२ सेगमेंटची उभारणी पूर्ण. भोसरी मेट्रो स्टेशनसाठी पायलिंग ऑपरेशन सुरु.
|
24 सप्टें. 2018
|
पुणेमेट्रो च्या मार्गिका २- वनाज ते सिविल कोर्ट मार्गाच्या प्रस्तावित आनंद नगर व वनाज या मेट्रो स्थानकांसाठी खांब उभारणी प्रगतीवर.
|
23 सप्टें. 2018
|
पुणेमेट्रो भाग १ पीसीएमसी-रेंजहिल्स च्या फुगेवाडी येथील सँडविक एशिया लिमिटेड समोर ग्राउंड सपोर्ट चौकट च्या मदतीने पहिला स्पॅन बसविले गेले आहे.
|
20 सप्टें. 2018
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठी नागरिकांच्या शंकांचे निरसन करत पुणे महानगर कामगार युनियनचे श्रमिक सभाग्रुह येथील पुणेमेट्रो संवाद संपन्न.
|
15 सप्टें. 2018
|
पुणेमेट्रो च्या शिवाजी नगर ते स्वारगेट या भूमिगत मार्गासाठी कृषी महाविद्यालय ग्राउंड येथे शाफ्ट चे काम वेगाने सुरु आहे. ६ मी. खोल, १४४ पाइल्सचे पाइलिंग ऑपरेशन पूर्ण.
|
14 सप्टें. 2018
|
पुणेमेट्रो मार्गिका२ वनाज-सिव्हील कोर्ट प्रकल्पाची प्रगती - गरवारे कॉलेज जवळ एकूण १३ खांबांसाठी ठोस पाया तयार व ११ खांबांचे काम प्रगतीवर - आनंद नगर येथे ४ स्पॅन पूर्ण व कचरा डेपो जवळ खांबांचे काम सुरु पौड रस्त्यावर कामाला वेग व कामाच्या भागात बॅरिकेडिंग.
|
11 सप्टें. 2018
|
पीसीएमसी ते मदर टेरेसा उडाणपुला पर्यंत रस्त्याच्या मध्य भागात पुणेमेट्रो भाग१ पीसीएमसी-रेंजहिल्स च्या कामासाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत.
|
10 सप्टें. 2018
|
पुणेमेट्रो भाग१ पीसीएमसी-रेंजहिल्स चे काम प्रगतीवर आहे सोबतच बोपोडी येथे सुद्धा कामाला सुरुवात होत आहे. कुंदन स्पेसेस च्या समोर बर्रीकॅडींग व सूचना फलक लावण्यात आले आहेत.
|
08 सप्टें. 2018
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठी व भुयारी मार्गाबाबतच्या शंकाचे निरसन करण्यासाठी ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, १४३५ , शुक्रवार पेठ, महात्मा फुले मंडई जवळ, पुणे येथे मेट्रो-संवाद आयोजित
|
05 सप्टें. 2018
|
पुणेमेट्रो तर्फे कर्वे रोड व नाशिक फाटा येथे रस्ता सुरक्षा जागरूकता अभियान.
|
04 सप्टें. 2018
|
पुणेमेट्रो भाग३ सिविल कोर्ट ते रामवाडी या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. राजा बहादूर मिल रोड ते बंड गार्डन रोड पर्यंत बर्रीकॅडींग सुरु व काही ठिकाणी भौगोलिक सर्वेक्षण प्रगतीवर.
|
04 सप्टें. 2018
|
डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो यांनी पुणेमेट्रो टीम सोबत रिच१ आणि रिच२ च्या कास्टिंग यार्ड ला भेट दिली व सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला.
|
01 सप्टें. 2018
|
आनंद नगर येथे पुणेमेट्रो भाग२ साठी चौथ्या स्पॅनला दिवस-रात्र पाळीत कामाला सुरुवात लाँचिंग गर्डर च्या साह्याने फक्त २ दिवसात १० सेगमेंट्स उचलल्या नंतर त्यांची आवश्यक भार चाचणी प्रगतीवर आहे.
|
31 ऑग. 2018
|
पुणेमेट्रो, पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस व महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक फाटा, डॉ. आंबेडकर चौक, पिंपरी व महावीर चौक, चिंचवड या तिन्ही ठिकाणी रिक्षाचालक यांना सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले.
|
27 ऑग. 2018
|
एकूण २३७ सेगमेंट्स पुणेमेट्रो च्या भाग१ पीसीएमसी -रेंजहिल्स येथे बसविण्यात आले आहेत. १४८ खांब उभे व ६९ खांबांवर कॅप तयार. १८८ खांबांसाठी ठोस पाया तयार. ह्याचसोबत नाशिक फाटा येथे सुद्धा खांब उभारणीचे काम प्रगतीवर आहे
|
25 ऑग. 2018
|
पुणेमेट्रो च्या मार्गिका२ वनाज ते सिविल कोर्ट साठी आनंद नगर येथे लाँचिंग गर्डरची उभारणी अखेरच्या टप्प्यात व स्थानकासाठी काम सुरु. खांबांची पायाभरणी मोरे विद्यालय पर्यंत पोहचले. कृष्णा हॉस्पिटल जवळील खांबांवर कॅप तयार.
|
21 ऑग. 2018
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठी व भुयारी मार्गाबाबतच्या शंकाचे निरसन करण्यासाठी एच. व्ही. देसाई कॉलेज येथे मेट्रो-संवाद आयोजित
|
15 ऑग. 2018
|
लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी उद्यानात माहिती केंद्र चे उद्घाटन
|
14 ऑग. 2018
|
पुणेमेट्रो टीम तर्फे नाशिक फाटा प्रस्तावित मेट्रो स्थानक जवळ एकमेकांत गुंतलेले दोन मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. हि झाडे ३५ ते ४० वर्ष जुनी आहेत ह्या झाडांचे पुनर्रोपण एसटीपी प्लांट कासारवाडी येथे करण्यात आले
|
09 ऑग. 2018
|
आनंद नगर येथे पुणेमेट्रो वनाज ते सिव्हिल कोर्ट साठी पहिल्या लाँचिंग गर्डरची उभारणी अखेरच्या टप्प्यात.
|
08 ऑग. 2018
|
पुणेमेट्रो तर्फे नियुक्त वाहतूक शाखा द्वारे बालशिक्षण मंदिर इंग्रजी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक जागरूकतेसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
|
07 ऑग. 2018
|
पुणेमेट्रो भाग १ पीसीएमसी-रेंजहिल्स च्या मेगा मार्ट जवळ ग्राउंड सपोर्ट चौकट च्या मदतीने पहिले स्पॅन बसविले गेले आहे व दुसऱ्या स्पॅन साठी सेगमेंट बसविण्यास सुरुवात झाली आहे.
|
06 ऑग. 2018
|
पुणेमेट्रो स्थानकांच्या बांधकामासाठी खांब उभारणी प्रगतीवर आहे, त्याच सोबत भाग२ वनाज ते सिविल कोर्ट साठी उभारण्यात आलेल्या किवळे येथील कास्टिंग यार्ड येथे सुद्धा कामाला सुरुवात झाली आहे.
|
03 ऑग. 2018
|
पुणेमेट्रो च्या भाग१ पीसीएमसी- रेंज हिल्स येथील पहिल्या मेट्रो स्थानकासाठी कॉनकोर्से स्थर पिअर आर्मचे कॉंक्रीटिंग पूर्ण. यावरच प्लॅटफॉर्म करीता दुसरा पिअर आर्म बांधला जाईल.
|
01 ऑग. 2018
|
महामेट्रो ने ११ महिन्याच्या विक्रमी वेळात १००० सेगमेंट्स बनवण्याचे कार्य कास्टिंग यार्ड येथे यशस्वीपणे पूर्ण केले.
|
30 जुलै 2018
|
वल्लभनगर येथे होणाऱ्या संत तुकाराम नगर पुणेमेट्रो स्थानकाजवळील ५ वृक्षांचे एसटीपी प्लांट कासारवाडी येथे पुनर्रोपण करण्यात आले.
|
30 जुलै 2018
|
वल्लभनगर येथे होणाऱ्या संत तुकाराम नगर पुणेमेट्रो स्थानकाजवळील ५ वृक्षांचे एसटीपी प्लांट कासारवाडी येथे पुनर्रोपण करण्यात आले.
|
29 जुलै 2018
|
पुणेमेट्रो च्या मार्गिका २ वनाज ते रामवाडी साठी आनंद नगर स्थानकाचे काम, एस्केलेटर व पायऱ्यासाठी खांब उभारणी ला सुरवात. या सोबतच आइडिअल कॉलनी स्थानकचे काम सुरु करण्यासाठी क्षेत्र सुरक्षित करण्यात आले.
|
24 जुलै 2018
|
महामेट्रो टीम तर्फे श्री. मिलिंद देऊस्कर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सेंट्रल रेल्वे-पुणे विभाग व इतर रेल्वे गटाच्या सदस्यांशी समन्वयिकरण बद्दल चर्चा करण्यात आली
|
23 जुलै 2018
|
पुणेमेट्रो टीम तर्फे नाशिक फाटा ते वल्लभ नगर बस स्थानक या मेट्रो मार्गांवर येणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येत आहे. ७८ वृक्षांचे एसटीपी प्लांट कासारवाडी येथे पुनर्रोपण करण्यात आले. सहकार्य केल्या बद्दल आभार.
|
20 जुलै 2018
|
पुणेमेट्रो मार्गिका १, पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गावर, फुगेवाडी येथे पुलाच्या कामाला सुरवात.
|
18 जुलै 2018
|
मेट्रोच्या कामाला नाशिक फाटा येथे सुरुवात. पाइल फाऊंडेशन साठी पाइलिंग रिग ह्या यंत्रणेच्या साहाय्याने भाग१ च्या भोसरी नाशिक फाटा मेट्रो स्थानक येथे पाइलिंग च्या प्रक्रियेला ला सुरुवात झाली आहे.
|
17 जुलै 2018
|
आनंद नगर येथे तिसरा स्पॅन पूर्ण. पुणेमेट्रो भाग२ वनाज-सिविल कोर्ट च्या पुलासाठी खांब उभारणीचे काम काळजी पूर्वक सुरु आहे. इतर सेगमेंट्स आता लौंचिंग गर्डर च्या मदतीने बसविले जाईल.
|
16 जुलै 2018
|
नदीपात्रातील पुणेमेट्रो चे काम खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने काही दिवस थांबवण्यात आले. वनाज-सिविल कोर्ट मार्गावर नदीपात्रात पाइलिंग रिगच्या मदतीने एकूण १०२ पाइलिंग पूर्ण, २४ खांबांसाठी ठोस पाया तयार, २३ खांबांचे काम जमिनीच्या पातळीपर्यंत, ३ खांब पिअरकॅप पर्यंत तयार.
|
13 जुलै 2018
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठी मेट्रो-संवाद आयोजित
|
11 जुलै 2018
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठी मेट्रो-संवाद आयोजित
|
09 जुलै 2018
|
डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो ह्यांची भारतात फ्रेंच राजदूत यांच्या नेतृत्वात पुणे स्मार्ट सिटी ला शिष्टमंडळाची भेट. पुणेमेट्रो प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीत एक मोठा बदल घडून आणेल या संमतीने चर्चा पूर्ण झाली.
|
05 जुलै 2018
|
वाकड येथील भाग२ वनाज-सिविल कोर्ट च्या कास्टिंग यार्ड येथे १७० सेगमेंट्स ब्लॉक्स तयार झाले आहेत, २० सेगमेंट्स खांबांवर बसविल्या गेले आहेत.
|
04 जुलै 2018
|
पुणेमेट्रो च्या भाग२ वनाज-सिविल कोर्ट येथे एकूण २० सेगमेंट्स पुलासाठी उभारल्या गेले आहेत व तिसऱ्या स्पॅन ला सुद्धा सुरुवात झालेली आहे, १८ खांब उभे व ७ खांबांवर कॅप तयार.
|
02 जुलै 2018
|
पुणेमेट्रो च्या मार्गिका १ पीसीएमसी ते रेंजहिल्स येथे एकूण १३२ सेगमेंट्स पुलासाठी येथे उभारल्या गेले आहेत, १०४ खांब उभे व ५० खांबांवर कॅप तयार.
|
30 जून 2018
|
पुणेमेट्रो च्या भाग १: पीसीएमसी- रेंज हिल्स येथील संत तुकाराम नगर ह्या पहिल्या स्थानकासाठी पियर आर्मच्या प्रक्रियेला सुरुवात.
|
29 जून 2018
|
पुणेमेट्रो च्या भूमिगत मेट्रो मार्गासाठी स्वारगेट येथे कामाला अखेर सुरुवात . शाफ्ट खोदण्याआधी होणारा पाइलिंग ऑपरेशन सुरु आणि भौगोलिक सर्वेक्षण द्वारे मातीची तपासणी प्रगतीवर.
|
18 जून 2018
|
आयडियल कॉलनी जवळ मार्गिका २ वनाज-सिविल कोर्ट येथे एकूण १८ सेगमेंट येथे उभारल्या गेले आहेत, १६ खांब उभे व ४ खांबांवर कॅप तयार, ७७ खांबांसाठी ठोस पाया तयार व इतर ठिकाणी उत्खनन चालू.
|
15 जून 2018
|
खराळवाडी येथे पुणेमेट्रो मार्गिका १ च्या पुलासाठी १२ व्या स्पॅन ची बांधणी प्रगतीवर. एकूण ११५ सेगमेंट्स येथे उभारल्या गेले आहेत. दर रात्री सुमारे ६ ते १० सेगमेंट्स लौंचिंग गर्डर च्या मदतीने उचलले जातात.
|
11 जून 2018
|
आनंद नगर येथे दुसरा स्पॅन पूर्ण. पुणेमेट्रो मार्गिका २ च्या पुलासाठी खांब उभारणीचे काम प्रगतीवर.
|
09 जून 2018
|
स्वारगेट येथे भूमिगत शाफ्टसाठी भौगोलिक सर्वेक्षण सुरु आहे. पुणेमेट्रो टीमसह कंत्राटदारांनी कामाचे निरीक्षण केले.
|
06 जून 2018
|
डॉ. दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो ह्यांनी पुणेमेट्रो टीम सोबत स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानकाच्या ठिकानाला भेट दिली.
|
05 जून 2018
|
पुणेमेट्रो मार्गिका २ वनाज ते सिविल कोर्ट साठी वाकड येथील कास्टिंग यार्ड येथे एकूण १२९ सेगमेंट्स तयार झाले आहेत.
|
05 जून 2018
|
जागतिकपर्यावरणदिना निमित्त पुणेमेट्रो तर्फे औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे १००० झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षारोपण करण्यासाठी डॉ. दीक्षित, एमडी #महामेट्रो, आमदार श्री. विजय काळे, महामेट्रोचे कार्यकारी संचालक श्री रामनाथ, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार श्री. लिमये, औंध आयटीआयचे प्राचार्य श्री. सायगावकर तसेच पर्यावरण प्रेमी, मेट्रोचे इतर कर्मचारी व तेथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
|
04 जून 2018
|
पुणेमेट्रो च्या मार्गिका १ पीसीएमसी ते रेंजहिल्स येथे एकूण ९९ सेगमेंट्स चे १० स्पॅन पूर्ण. ८९ खांब उभे व ४७ खांबांवर कॅप तयार. १६१ खांबांसाठी ठोस पाया तयार व इतर ठिकाणी उत्खनन चालू.
|
31 मे 2018
|
छत्रपती संभाजीराजे उद्यानाच्या मागे वनाज-सिविल कोर्ट मार्गावर नदी पात्रात खांब उभारणी साठी, पाइलिंग रिग ह्या यंत्रणेच्या मदतीने ठोस पाया, पाइल फाऊंडेशन द्वारे तयार करण्यात येत आहे.
|
29 मे 2018
|
कासारवाडी सबवेजवळ महामेट्रो चे काम आज दि. २९ मे पासून चालू करण्यात येणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले.
|
24 मे 2018
|
पुणेमेट्रो मार्गिका १ पीसीएमसी - रेंजहिल्स च्या कामाला हॅरिस ब्रिज येथे सुद्धा सुरुवात झाली आहे. तेथील खांब उभारणीसाठी ठोस पाया तयार होत आहे.
|
23 मे 2018
|
पुणेमेट्रो मार्गिका १ पीसीएमसी - रेंजहिल्स साठी कास्टिंग यार्ड येथे ६०५ सेगमेंट्स तयार आहेत. त्यापैकी ८९ सेगमेंट्स च्या उपयोगाने पूलबांधणीसाठी ९ स्पॅन उभारण्यात आले आहे.
|
22 मे 2018
|
एकूण १६७ वृक्षांच्या पुनर्रोपण सोबत पुणेमेट्रो तर्फे एका वृक्षामागे १० वृक्षांची लागवड केली जात आहे. आतापर्यंत एकूण ३१६५ झाडे लावण्यात आली आहे. ह्यावर्षी एकूण ६००० झाडे लावण्याची योजना आहे.
|
21 मे 2018
|
कासारवाडी सबवे जवळ पुणेमेट्रो मार्गिका १ च्या कामासाठी वाहतुकीत फेरबदल करण्यात आले ह्याची रंगीत तालीम घेण्यात आली.
|
19 मे 2018
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठी मेट्रो-संवाद आयोजित
|
18 मे 2018
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठी मेट्रो-संवाद आयोजित
|
17 मे 2018
|
पुणेमेट्रो मार्गिका१ पीसीएमसी ते रेंजहिल्स येथे एकूण ७९ सेगमेंट्स चे ८ स्पॅन पूर्ण. ८१ खांब उभे व ४६ खांबांवर कॅप तयार. ११६ खांबांसाठी ठोस पाया तयार व इतर ठिकाणी उत्खनन चालू.
|
15 मे 2018
|
पुणेमेट्रो च्या मार्गिका २ वनाज-सिविल कोर्ट येथे ९ सेगमेंट्स चा एक स्पॅन पूर्ण झाला आहे. ६ खांब पूर्ण व २१ खांबांची उभारणी प्रगतीवर, पुढील स्पॅनसाठी ३ खांबांवर कॅप तयार, ६२ खांबांसाठी ठोस पाया तयार व इतर ठिकाणी उत्खनन चालू.
|
07 मे 2018
|
स्वारगेट ते कात्रज व पीसीएमसी ते निगडी पर्यंत मेट्रो मार्गाच्या भविष्यात होणाऱ्या विस्तारासाठी जर्मनीतील KfW बँक अधिकारी ह्यांची श्री रामनाथ, कार्यकारी संचालक, पुणेमेट्रो व इतर अधिकार्यांसह मार्गाची पाहणी करण्यात आली.
|
06 मे 2018
|
पुणेमेट्रो मार्गिका २ वनाज-सिविल कोर्ट साठी वाकड येथे उभारण्यात आलेल्या कास्टिंग यार्ड येथे ५० सेगमेंट्स ब्लॉक्स तयार झाले आहेत.
|
05 मे 2018
|
पुणेमेट्रो ने आनंद नगर येथे मार्गिका २ च्या पुलासाठी लागणारा पहिला सेगमेंट स्पॅन पूर्ण केला
|
02 मे 2018
|
मार्गिका १ च्या इतर स्थानकांबरोबरच प्रस्तावित पुणेमेट्रो संत तुकाराम नगर स्थानकासाठी खांबांचे बांधकाम चालू आहे. येथे २२ खांबासाठी ठोस पाया तयार करण्यात आला आहे. सर्व स्थानके पादचारी पुलाने जोडले जाणार व रस्ता ओलांडण्यासाठी सुद्धा वापरता येणार.
|
27 एप्रि 2018
|
आनंद नगर येथे पौड रस्त्यावर पहिला स्पॅन लवकरच पूर्ण होणार. एकूण ५१ खांबासाठी ठोस पाया तयार करण्यात आला आहे. बाकीच्या खांबांसाठी तसेच कर्वे रस्त्यावर उत्खननचे काम प्रगतीपथावर.
|
23 एप्रि 2018
|
डॉ. दीक्षित, एमडी महामेट्रो यांनी पुणेमेट्रो टीम सोबत नदी पात्राजवळ तयार होणाऱ्या डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला भेट दिली.
|
20 एप्रि 2018
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठी मेट्रो-संवाद आयोजित
|
17 एप्रि 2018
|
हॅरिस पुलाच्या खाली पुणेमेट्रो मार्गिका १ च्या कामाला सुरवात झाली आहे. ह्यासाठी, वाहतूक वळवण्यात आली आहे. पुणे मेट्रोच्या बांधकाम स्थळाच्या दोन्ही बाजू सूचना फलक लावल्या गेले आहेत.
|
15 एप्रि 2018
|
खराळवाडी येथे पुणेमेट्रो मार्गिका १ च्या पुलासाठी सातव्या स्पॅन ची बांधणी प्रगतीवर.. एकूण ६१ सेगमेंट येथे उभारल्या गेले आहेत. ४० खांबांचे पियर कॅप कंक्रीटींग पूर्ण झाले आहेत.
|
13 एप्रि 2018
|
खराळवाडी येथे पुणेमेट्रो मार्गिका १ च्या पुलासाठी सातव्या स्पॅन ची बांधणी प्रगतीवर. एकूण ६९ सेगमेंट येथे उभारल्या गेले आहेत. तसेच १११ खांबांसाठी ठोस पाया तयार करण्यात आलेला आहे, ७३ खांब उभे झालेत व ४३ खांबांचे पियर कॅप कंक्रीटींग पूर्ण झाले आहेत.
|
12 एप्रि 2018
|
कर्वे रस्त्यावर मार्गिका २ साठी पुणेमेट्रो च्या कामाला आता सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आनंदनगर येथे दुसऱ्या खांबावर सेगमेंटची उभारणी पूर्ण.
|
09 एप्रि 2018
|
पुणेमेट्रो स्थानकांच्या बांधकामासाठी खांबांची उभारणी प्रगतीवर आहे त्याच सोबत नुकतेच उभारण्यात आलेल्या मार्गिका १ साठी किवळे येथील कास्टिंग यार्ड येथे सुद्धा कामाला सुरुवात झाली आहे. पहिला आरसीसी गर्डर तयार झाला आहे.
|
08 एप्रि 2018
|
नाशिक फाट्या जवळील कास्टिंग यार्ड येथे सुद्धा पुणेमेट्रो चे काम वेगाने सुरु. ४३८ सेगमेंट्स ब्लॉक्स तयार.
|
06 एप्रि 2018
|
पुणेमेट्रो च्या कामाला कर्वे रस्त्यावर आजपासून सुरुवात झाली आहे. डेक्कन कॉर्नर पासून पत्र्याचे शेड लावणे सुरु झाले आहेत.
|
02 एप्रि 2018
|
डॉ. दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो यांनी पुणेमेट्रो टीम सोबत कीवळे येथील नव्याने विकसित कास्टिंग यार्ड ला भेट दिली. मार्गिका १ पीसीएमसी - रेंजहिल्स च्या स्थानकांसाठी लागणारे गर्डर्स येथे बनविण्यात येणार आहेत
|
31 मार्च 2018
|
१२५ झाडे वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आली. त्यात अशोका, पाल्म ट्री , दोन मोठी झाडे व बरीच इतर झाडे होती. हि झाडे एसटीपी प्लांट कासारवाडी, रोझ गार्डन, आकुर्डी, पीसीएमसी ग्राउंड आणि मुथा नदीपात्रात लावल्या गेली आहेत.
|
29 मार्च 2018
|
खराळवाडी येथे पुणेमेट्रो मार्गिका १ च्या पुलासाठी साठी स्पॅन बांधणी प्रगतीवर. एकूण ४० सेगमेंट येथे उभारल्या गेले आहेत. तसेच ९७ खांबांसाठी ठोस पाया तयार करण्यात आलेला आहे, ६१ खांब उभे झालेत व ३२ खांबांचे पियर कॅप कंक्रीटींग पूर्ण झाले आहेत.
|
28 मार्च 2018
|
पुणेमेट्रो मार्गिका २ वनाज-सिविल कोर्ट येथे सेगमेंट उभारणी सोबत नदीपात्रात ११, पौड रस्त्यावर २२ अशे एकूण ३३ खांबासाठी ठोस पाया तयार झाला आहे.
|
24 मार्च 2018
|
१० महिन्यांपूर्वी, डॉ. दीक्षित, एमडी महामेट्रो ह्यांच्या हस्ते अकुर्डी क्षेत्र २९ येथे वृक्षारोपण अभियान अंतर्गत लागवड केलेले, निसर्गाला पोषक ठरणारे झाडांची उंची चांगलीच वाढली आहे.
|
22 मार्च 2018
|
मार्गिका १ येथील पहिले पुणेमेट्रो स्थानक "संत तुकाराम नगर" च्या बांधकामासाठी एकूण २७ खांबांसाठी ठोस पाया तयार व खांब उभारणी ला सुरुवात.
|
20 मार्च 2018
|
#पुणेमेट्रो रेल्वे प्रकल्प मार्गिका २: वनाझ ते रामवाडी येथे पूल उभारणी साठी पहिल्या व्हायाडक्ट सेगमेंटची उभारणी ला सुरवात झाली.
|
19 मार्च 2018
|
डॉ. दीक्षित, एमडी, महामेट्रो ह्यांनी पुणेमेट्रो टीम सोबत आनंद नगर येथील मार्गिका २: वनाझ ते रामवाडी मार्गावरील तयार पहिल्या दोन खांबांची पाहणी केली व वाहतूक व्यवस्थापनाच्या सोबत कामगारांच्या सुरक्षेततेचा सुद्धा आढावा घेतला.
|
16 मार्च 2018
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठी मेट्रो-संवाद आयोजित
|
13 मार्च 2018
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठी मेट्रो-संवाद आयोजित
|
12 मार्च 2018
|
मार्गिका २ साठी #पुणेमेट्रो चा पहिला आणि दुसरा खांब पौड रस्त्यावरील आनंद नगर येथे पूर्ण
|
11 मार्च 2018
|
कोथरूड येथे पुणेमेट्रो च्या पहिल्या खांबवर पियर कॅप कंक्रीटींग झाले. इतर खांबांचे पाया तयार करण्याचे काम प्रगतीपथावर. सोबतच पूल उभारणीसाठी लागणारे सेगमेंट ब्लॉक्स कास्टिंग यार्ड येथे तयार होत आहे.
|
10 मार्च 2018
|
राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह अंतर्गत पुणेमेट्रो कामगारांसाठी आग लागल्याच्या वेळी आपली व इतरांची सुरक्षा करीत मॉक ड्रिल व प्रशिक्षण देण्यात आले.
|
08 मार्च 2018
|
पुणेमेट्रो तर्फे मोरे विद्यालय, कोथरूड येथील सहयोग केंद्र येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. उच्च अधिकारी मंडळी सोबत एकूण ४२ कर्मचाऱ्यांनी रक्त दान केले.
|
05 मार्च 2018
|
४७ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहा साजरा करण्यासाठी पुणेमेट्रो तर्फे मार्गिका व कास्टींग यार्ड येथील सर्व कामगारांसाठी आठवडाभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
|
05 मार्च 2018
|
पाइल फाऊंडेशन साठी पाइलिंग रिग ह्या यंत्रणेच्या साहाय्याने फुगेवाडी मेट्रो स्थानक येथे पाइलिंग च्या प्रक्रियेला ला सुरुवात झाली आहे.
|
01 मार्च 2018
|
खराळवाडी येथे #पुणेमेट्रो मार्गिका १ साठी दुसरा स्पॅन पूर्ण.
|
28 फेब्रु. 2018
|
पुणेमेट्रो च्या पोहोच २ वनाज ते सिविल कोर्ट प्रकल्पाची प्रगती: दोन खांबांचे शटरिंग अंशतः पूर्ण, एकूण १६ खांबांसाठी ठोस पाया तयार व इतर ठिकाणी उत्खनन चालू आहेत.
|
24 फेब्रु. 2018
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठी मेट्रो-संवाद आयोजित
|
23 फेब्रु. 2018
|
आतापर्यंत मार्गिका एक पीसीएमसी-रेंजहिल्स च्या ८८ खांबांसाठी ठोस पाया तयार करण्यात आलेला आहे तसेच ५० खांब उभे झालेत व २० खांबांचे पियर कॅप कॉंक्रीटींग पूर्ण झाले आहेत.
|
15 फेब्रु. 2018
|
डॉ. दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो, श्रीमती माधुरी मिसाळ, आमदार आणि सल्लागार श्री. लिमये ह्यांनी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी व स्वारगेट येथे होणाऱ्या मल्टीमॉडल एकत्रीकरण बद्दल चर्चा केली.
|
14 फेब्रु. 2018
|
पुणेमेट्रो च्या भूमिगत मार्गाची पाहणी डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो व उच्च अधिकारी ह्यांच्या द्वारे नदीपात्रा पासून मंडई पर्यंतची पाहणी करण्यात अली.
|
14 फेब्रु. 2018
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठी मेट्रो-संवाद आयोजित
|
11 फेब्रु. 2018
|
खराळवाडी येथे मार्गिका १ पीसीएमसी-रेंजहिल साठी #पुणेमेट्रो चा पहिला लाँचिंग गर्डर उभारण्यात आला.
|
10 फेब्रु. 2018
|
संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाच्या ९ खांबांसाठी ठोस पाया तयार करण्यात आले आहे. तसेच इतर स्थानकांसाठी भौगोलिक सर्वेक्षण चालू आहेत आणि लवकरच बांधकाम सुरू होईल.
|
09 फेब्रु. 2018
|
नाशिक फाट्याजवळ मार्गिका १ साठी आतापर्यंत १५८ सेगमेंट्स ब्लॉक्स तयार झाले आहेत.
|
04 फेब्रु. 2018
|
मार्गिका १ पीसीएमसी-रेंजहिल्स येथे ७९ खांबांसाठी ठोस पाया तयार करण्यात आला आहे, ४१ खांब उभे झालेत व १२ खांबांचे पियर कॅप कंक्रीटींग पूर्ण झाले आहेत
|
03 फेब्रु. 2018
|
नागरी संपर्क आणि जनजागृतीसाठी पुणेमेट्रो तर्फे मेट्रो सांवादाचे आयोजन.
|
01 फेब्रु. 2018
|
मेट्रोच्या बांधकामावेळी नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी एसएनडीटी महाविद्यालय ते डेक्कन दरम्यानचा रस्ता रुंदीकरण्याला सुरुवात झाली
|
26 जाने. 2018
|
श्री लिमये, श्री रामनाथ, व पुणेमेट्रो टीम द्वारे फुगेवाडी कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
|
25 जाने. 2018
|
नदीपात्रात २ तर वनाज येथे ६ अशे ८ खांबासाठी काँक्रेट फुटिंग पूर्ण तसेच पहिल्या खांबासाठी शटरिंग व बाकीच्या खांबांसाठी उत्खननचे काम प्रगतीपथावर.
|
23 जाने. 2018
|
महामेट्रो प्रथम वर्धापनदिना दिवशी विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
|
23 जाने. 2018
|
महामेट्रो प्रथम वर्धापनदिना निमित्त आयोजित परिसंवाद बाल गंधर्व रंगमंदिर येथे संपन्न.
|
21 जाने. 2018
|
‘वसंतोत्सव’ २०१८ संगीत महोत्सवात, डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो ह्यांनी नागरिकांशी संवाद साधले.
|
20 जाने. 2018
|
महामेट्रो च्या प्रथम वर्धापनदिन साजरीकरण अंतर्गत पिंपरी चिंचवड व पुणे मा.न.पा परिसरातील शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन.
|
19 जाने. 2018
|
महामेट्रो प्रथम वर्धापन दिवस निमित्त पुणेमेट्रो द्वारे स्वच्छता मोहिम. नदी पात्राला स्वच्छ करण्यात आले.
|
18 जाने. 2018
|
फ्रेंच डेव्हलपमेंट बँकेच्या व युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या शिष्टमंडळाचे पुणेमेट्रो प्रकल्प पाहणीसाठी भेट.
|
18 जाने. 2018
|
पुणेमेट्रो च्या पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथे नियोजित स्थानकाचे भूमिपूजन पालकमंत्री मा. श्री. गिरीशजी बापट यांच्या हस्ते व मा. महापौर श्री नितीनजी काळजे, पी.ची. महानगरपालिका व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.
|
16 जाने. 2018
|
महामेट्रो ने खराळवाडी येथे पहिला सेगमेंट स्पॅन पूर्ण केला.
|
15 जाने. 2018
|
पुणेमेट्रो आली आपली मेट्रो घोषवाक्य स्पर्धा निकाल घोषित.
|
15 जाने. 2018
|
पुणेमेट्रो चे काम नदी पात्रात सुद्धा जोरात. तेथील पहिल्या खांबासाठी ठोस पाया तयार करण्यात आला आहे.
|
15 जाने. 2018
|
पुणेमेट्रो "आली आपली मेट्रो" घोषवाक्य स्पर्धा निकाल जाहीर करण्यात आले.
|
13 जाने. 2018
|
पुणेमेट्रो टीम ने वनाज येथे रस्ता सुरक्षा आठवडा साजरा केला.
|
10 जाने. 2018
|
डॉ. दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो, श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त आयुक्त, पीएमसी आणि श्री कोन्ग वाई मुन, सीईओ एससीई यांच्या दरम्यान पुण्यातील शहरी व्यवस्थापन (मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट) कार्यक्रमासाठी स्वाक्षरीकरण झाले.
|
09 जाने. 2018
|
पुणेमेट्रो मार्गिका २ वनाज ते सिविल कोर्ट येथे खांब उभारणी चे काम सुरु असतांना सेगमेंट बनविण्यासाठी लागणारे कास्टिंग यार्ड सुद्धा भूमकर चौक येथील मारुंजी येथे उभारण्यात आले आहे.
|
09 जाने. 2018
|
खराळवाडी येथे पुणेमेट्रो रीच १ च्या खांबावरील पुलाच्या बांधणीसाठी(व्हायाडक्ट) दुसरा सेगमेंट यशस्वीरित्या जोडला गेला
|
08 जाने. 2018
|
मराठी भाषा पंधरवडानिमित्त मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने महामेट्रो तर्फे 'आली आपली मेट्रो' घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली
|
04 जाने. 2018
|
पिंपरी ते रेंज हिल्स मार्गा वर एकूण ५० हुन अधिक खांबांचे काम सुरु आहे. नाशिक फाट्याजवळील कास्टिंग यार्ड येथे एकूण ७२ सेगमेंट्स तयार झाले आहेत, ६ गॅन्ट्री क्रेन उभारण्यात येतील. ४ उभारल्या गेले आहे तर २ चे काम प्रगतीपथावर.
|
26 डिसें. 2017
|
श्री लिमये, श्री रामनाथ, व पुणेमेट्रो टीम द्वारे फुगेवाडी कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
|
24 डिसें. 2017
|
पुणे मेट्रो ला एक वर्ष पूर्ण. एक वर्षा पूर्वी आज ह्या दिवशी मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीं च्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे ऐतिहासिक भूमिपूजन करण्यात आले होते.
|
23 डिसें. 2017
|
कामगारांना प्रोत्साहित करण्यासाठी, महामेट्रो टीम तर्फे त्यांना सुरक्षा पुरस्कार देण्यात आले ज्यांनी पुणेमेट्रो मार्गिका २ साठी उत्कृष्ट कार्य केले.
|
21 डिसें. 2017
|
पुणेमेट्रो मार्गिका २ वनाज-सिविल कोर्ट येथे पहिल्या खांबासाठी शटरिंग व दुसऱ्या खांबासाठी काँक्रेट फुटिंग तसेच बाकीच्या खांबांसाठी उत्खननचे काम प्रगतीपथावर.
|
18 डिसें. 2017
|
नागरी संपर्क आणि जनजागृतीसाठी पुणेमेट्रो तर्फे मेट्रो सांवादाचे आयोजन.
|
14 डिसें. 2017
|
पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ते रेंज हिल मार्गिके दरम्यान खराळवाडी येथे पुणेमेट्रो रीच १ च्या उन्नती मार्गावरील पहीले व्हायाडक्ट सेगमेंट बसवले गेले.
|
12 डिसें. 2017
|
पुणे मेट्रोच्या बांधकाम साहित्याच्या चाचण्यांसाठी ब्यूरो व्हेरिटास शी करार - साहित्य चाचणी प्रयोगशाळा उभारणार
|
09 डिसें. 2017
|
५ वृक्षांना वल्लभनगर येथील पुणेमेट्रो सहयोग केंद्राच्या मागे पुनर्रोपण करण्यात आले.
|
02 डिसें. 2017
|
कामगार सुरक्षा हस्तपत्रकाचे उद्घाटन डाॅ. दिक्षीत, #महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते करण्यात आले.
|
02 डिसें. 2017
|
"पुणेमेट्रो चे पहिले मेट्रो स्टेशन संत तुकाराम नगर येथे तयार होणार", असे डॉ. दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
|
28 नोव्हें. 2017
|
पुणेमेट्रो च्या वनाज ते सिविल कोर्ट मार्गावर 24/7 सेवा देणारे शीघ्र कृती दल (Quick Response Team) कार्यान्वीत करण्यात आले आहे.
|
26 नोव्हें. 2017
|
पुणेमेट्रो च्या मार्गिका २ च्या पहिल्या खांबासाठी ठोस पाया उभारल्या गेला आहे.
|
19 नोव्हें. 2017
|
पुणेमेट्रो च्या रामवाडी ते शिवाजीनगर या मार्गाची पाहणी डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो व उच्च अधिकारी ह्यांच्या द्वारे करण्यात अली.
|
18 नोव्हें. 2017
|
पुणेमेट्रो चे सहयोग केंद्र चे उद्घाटन वल्लभ नगर येथे, डॉ. दीक्षित, एमडी महामेट्रो यांच्या हस्ते संपन्न.
|
18 नोव्हें. 2017
|
डॉ. दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो यांनी पुणेमेट्रो टीम सोबत शिवाजीनगर येथील धान्य गोदाम येथे भेट दिली.
|
13 नोव्हें. 2017
|
#पुणेमेट्रो साठी पहिले "सहयोग केंद्र" उभारण्यात आले. पत्ता: एसटी स्थानकाच्या मागे, वल्लभनगर, पिंपरी येथे. टोल फ्री क्रमांक: १८००२७०५५०१
|
13 नोव्हें. 2017
|
महामेट्रो च्या शिस्तबद्ध पद्धतीने पुणेमेट्रो चे दुसरे खांब खराळवाडी येथे उभे
|
12 नोव्हें. 2017
|
नाशिक फाटा-खराळवाडी सोबत, फुगेवाडी येथे पुणेमेट्रो चे काम सीएमई गेट पासून तर मेगामार्ट पर्यंत सुरू झाले आहे. ६ खांब आणि १५ प्लेन कॉंक्रिट फुटिंग चे काम पूर्ण झाले आहेत.
|
09 नोव्हें. 2017
|
पुणेमेट्रो संवाद बेडेकर गणपती मंदिर येथे झाले
|
07 नोव्हें. 2017
|
पुणेमेट्रो वनाज ते रामवाडी या मार्गासाठी भौगोलिक सर्वेक्षण चे काम नदीपात्रावर सुरु.
|
06 नोव्हें. 2017
|
4 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत हैदराबाद येथे आयोजित ३ दिवसीय यूएमआय आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये महामेट्रो प्रकल्पाला सर्वोत्तम शहरी गतिशीलता प्रकल्पासाठी पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
|
27 ऑक्टो. 2017
|
इंटरचेंज स्टेशनसाठी महा-मेट्रोला शिवाजीनगर येथील धान्य गोदामाची जागा मिळाली आहे.
|
24 ऑक्टो. 2017
|
नाशिक फाट्याजवळ पुणे मेट्रोचा पहिला पिलर उभा राहिला
|
18 ऑक्टो. 2017
|
पुणे मेट्रोने एम.ई.एस सभागृह, कोथरूड आणि भरतनाट्य मंदिर, पुणे येथे "सुप्रभात ते गुड मॉर्निंग" या कार्यक्रमाचे आयोजन केले. या माध्यमाने नागरिकांनी एका संगीतमय रम्य संध्याकाळचा आनंद घेतला
|
16 ऑक्टो. 2017
|
पुणे मेट्रो उन्नती मार्गाच्या बांधकामासाठी ठराविक वेळेसाठी नाशिक फाटा ते खारलवाडी विभाजक रस्ता बंद करण्याची सूचना देण्यात आली.
|
08 ऑक्टो. 2017
|
आपली मेट्रो जाणून घ्या - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे नागरिकांसाठी संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोड उपस्थित होते. श्री. लिमये आणि श्री सुब्रमण्यम यांनी अतिशय सुंदर सादरीकरण केले.
|
05 ऑक्टो. 2017
|
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीक्षित आणि पुणे मेट्रो चमूने वनाज मार्गाजवळ चालू असलेल्या उत्खनन कार्यस्थळांवर पाहणी व तपासणी केली आणि रहदारीच्या स्थितीचे पुनरावलोकन केले.
|
28 सप्टें. 2017
|
पुणे मेट्रो प्रकल्पाची सुरुवात वनाजजवळील पौड रोडपासून झाली आहे.
|
28 सप्टें. 2017
|
पुणे मेट्रो कॉरिडॉर -2 वनाज-सिव्हिल कोर्ट येथील मेट्रो बांधकामाचे उद्घाटन पालक मंत्री गिरीश बापट, महापौर श्रीमती मुक्ता तिलक, आमदार श्रीमती मेधा कुलकर्णी आणि सर्व नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आले.
|
25 सप्टें. 2017
|
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक मा. ब्रिजेश दीक्षित यांनी पुणे मेट्रो चमूसह मा. महापौर श्रीमती मुक्ता टिळक, पीएमसी आयुक्त कुणाल कुमार आणि सर्व नगरसेवकांसह चर्चात्मक संवाद साधला
|
14 सप्टें. 2017
|
पहिल्या स्तंभाच्या उभारणीस इतर खांबांचे बांधकाम वेगाने प्रगतीपथावर आहे. काम खराळवाडीपर्यंत पोचले आहे.
|
11 सप्टें. 2017
|
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतीजवळ भू-तंत्रज्ञान सर्वेक्षण चालू आहे.
|
05 सप्टें. 2017
|
नाशिक फाट्याजवळील कास्टिंग यार्ड येथे दररोज सुरक्षा साधक बैठक आयोजित केली.
|
01 सप्टें. 2017
|
नाशिक फाट्याजवळील नव्याने विकसित कास्टिंग यार्डमध्ये उन्नती मार्गाच्या (viaducts) बांधकामात वापरण्यात येणार्या काँक्रीट गर्डरची निर्मिती सुरु झाली आहे.
|
01 सप्टें. 2017
|
खारलवाडी येथे पुणे मेट्रोचा 10 वा स्तंभ उभारणे प्रगतीपथावर आहे.
|
24 ऑग. 2017
|
पहिल्या रिचच्या रूटवर ७ खांबांचे बांधकाम प्रगतीपथावर
|
24 ऑग. 2017
|
फायरिंग डिझाईन वापरण्यासाठी मातीची सुरक्षित राखण्याची क्षमता निश्चित करण्यासाठी हिंदुस्थान अँटीबायोटिक्सजवळील खारलवाडी येथे प्लेट लोड टेस्ट सुरु
|
19 ऑग. 2017
|
पुणे मेट्रो रेलचे कार्यालय घोले रोड संग्रहालयाचे उदघाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक मा. ब्रिजेश दीक्षित यांच्या समवेत पालकमंत्री श्री. गिरीशजी बापट यांच्या हस्ते करण्यात आले.
|
10 ऑग. 2017
|
भूमिगत मार्गांसाठी एएफडी आणि पुणे मेट्रो टीमची कार्यस्थळाला भेट
|
09 ऑग. 2017
|
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीक्षित आणि फ्रेंच डेव्हलपमेंट बँक (एएफडी)चे संचालक श्री. निकोलस, यांच्या प्रतिनिधीमंडळाने पत्रकार परिषदेत माहिती दिली
|
09 ऑग. 2017
|
पुणे मेट्रो टीमने एएफडी फ्रेंचच्या चमूसोबत कार्यस्थळाला भेट दिली
|
08 ऑग. 2017
|
पुणे नाशिक फाट्याजवळील पहिल्या पिलरचे काम होऊन पुढील काम प्रगतीपथावर
|
07 ऑग. 2017
|
पुणे मेट्रो चमूने एसओएफओएसएच श्रीवास्तव चाईल्ड केअर सेंटर ला भेट देऊन. तेथील मुलांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले
|
05 ऑग. 2017
|
पुणे मेट्रो टीमने खडकी एज्युकेशन सोसायटी येथे मेट्रो संवाद आयोजित केला
|
27 जुलै 2017
|
पुणे मेट्रो टीमने रिच-१ च्या कासारवाडी येथील दुसर्या स्तंभाचे बांधकाम पूर्ण झाले. तिसरे आणि चौथे पिलारचे कार्य वेगाने चालू आहे.
|
25 जुलै 2017
|
ट्रॅफिक डायव्हर्सन : नाशिक फाट्याजवळ पुणे मेट्रोसाठी सौर ऊर्जायुक्त डिजिटल सूचना फलकांचा वापर केला.
|
21 जुलै 2017
|
पुणे मेट्रोच्या वतीने, मेट्रो कार्यालय फुगेवाडी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सीओईपी प्रा. रावळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त आर भामरे यांच्याशी चर्चा करण्यात आली
|
21 जुलै 2017
|
रिच-१ आणि रिच-२ येथे पोहोचण्यासाठी पुणे मेट्रो मार्गाचा नकाशा नागरिक माहिती केंद्रात सामील करण्यास सुरुवात झाली आहे.
|
20 जुलै 2017
|
बीआरटीएस आणि पुणे मेट्रो COEP च्या मदतीने सर्व्हिस रोडमधून वाहन वळविण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांबरोबर चर्चा करेल.
|
13 जुलै 2017
|
पुणे मेट्रो डेपोसाठी आणि भूमिगत मार्गासाठी ऍग्रीकल्चर महाविद्यालयातून भौगोलिक सर्वेक्षण सुरु करण्यात आले
|
12 जुलै 2017
|
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी पुणे मेट्रो समुहाबरोबर PCMC येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले
|
12 जुलै 2017
|
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी पुणे मेट्रो समुहाबरोबर नाशिक फाटाजवळील पहिल्या स्तंभाच्या कामाचा आढावा घेतला आणि वाहतूक व्यवस्थापनाबद्दल जाणून घेतले
|
09 जुलै 2017
|
नाशिक फाट्याजवळील पहिल्या पिलरच्या कॉंक्रिट पाया बनविण्याचे काम पूर्ण
|
04 जुलै 2017
|
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीक्षित, यांनी भारताच्या जनसंपर्क परिषदेसह, पुणे अध्यायाचे विशेष संवाद सत्र आयोजित केले.
|
03 जुलै 2017
|
मेट्रो वनविहार तालजई हिल, पाचगाव पर्वती येथे पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण अभियान चालविण्यात आले.
|
03 जुलै 2017
|
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीक्षित, यांनी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद संबोधित केली
|
30 जून 2017
|
नाशिक फाट्याजवळ पुणे मेट्रो फाऊंडेशनचा एक पिलर पूर्ण झाल्यानंतर पुढील 2 खांबांसाठी नियोजन आणि उत्खननाला सुरुवात झाली.
|
24 जून 2017
|
पुणे मेट्रो चमूने मंगलदास रोडवरील PIC अड्डा येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरला पुणे मेट्रो बद्दल माहिती प्रदान केली
|
22 जून 2017
|
पुणे मेट्रोने प्राथमिक कार्यात मेट्रोच्या पहिल्या पिलरच्या बांधकामाला सुरुवात केली
|
20 जून 2017
|
पुणे महापालिकेच्या आम बैठकीत पुणे मेट्रो चमूने नगरसेवकांशी संवाद साधला.
|
17 जून 2017
|
पुणे मेट्रोने निगडी परिसरात पाचव्या मेट्रोसंवाद या जनजागृती आणि माहितीपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले
|
17 जून 2017
|
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दीक्षित यांनी पुणे मेट्रोच्या रिच-१ भागाला भेट दिली. कामाची गती वाढवायला आणि पावसाळ्या दरम्यान सुरक्षेची खबरदारी अधिक सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या
|
13 जून 2017
|
महाराष्ट्र कॅबिनेटने पुणे मेट्रो रेल प्रकल्पातील एमओयू फेज -1 चा मसुदा मंजूर केला.
|
05 जून 2017
|
लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी फीडर सर्व्हिसचा भाग म्हणून एका बॅटरी वर चालणाऱ्या सोलर प्लस वाहनाचे डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी उदघाटन केले
|
05 जून 2017
|
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दीक्षित यांनी सेक्टर २९. आकुर्डी येथे पुणे मेट्रो चमू समवेत वृक्षारोपण केले
|
01 जून 2017
|
पुणे मेट्रोबांधकाम सुरु करण्यासाठी मूठा नदीजवळील परिसरात भूस्थिर तपासणी सुरु झाली.
|
01 जून 2017
|
नाशिक फाट्याजवळ मेट्रोच्या बांधकामाला सुरुवात झाली
|
25 मे 2017
|
मेट्रो बांधकामासाठी नाशिक फाट्यावरील रस्त्यावर बॅरिकेड उभारण्यात आले आहेत.
|
17 मे 2017
|
महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ समितीने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंडरग्राउंड स्थानकांचे प्रस्तावित मार्ग तपासून आढावा घेतला
|
06 मे 2017
|
भारती अपार्टमेंट, शिवाजी नगर येथे भूमिगत मेट्रो स्टेशनसाठी भौगोलिक तांत्रिक सर्वेक्षण चालू आहे
|
27 एप्रि 2017
|
120 दिवसात, डीजीपीएस - 100%, भौगोलिक - 94% आणि भौतिक-82% पूर्ण
|
13 एप्रि 2017
|
पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स मधील 10.75 किलोमीटरच्या रूट विस्तारासाठी निविदा मागविण्यात आली आहे.
|
13 एप्रि 2017
|
डॉ. दीक्षित यांनी कृषी महाविद्यालय डेपो येथील हिंगणे, खडकवासला धरण, आकुर्डी, स्वारगेट बांधकाम स्थळाला भेट दिली,
|
11 एप्रि 2017
|
नागरी संपर्क आणि जनजागृतीसाठी सुरु करण्यात आलेल्या माहिती मालिकेचे चौथ्या मेट्रो संवादाचे पुणे मेट्रोने आयोजन केले आहे,
|
07 एप्रि 2017
|
7.150 कि.मी. लांबीचे वनाझ ते सिविल कोर्ट येथी रूट विस्तारासाठीची द्वितीय निविदा जारी करण्यात आली आहे.
|
22 मार्च 2017
|
नागरिक संवाद आणि जागरुकता यासाठी सुरु केलेली मेट्रो संवाद या माहिती मालिकेचे ३ रे सत्र आयोजित केले गेले
|
15 मार्च 2017
|
भूमी सर्वेक्षणाचे ७५% कार्य पूर्ण
|
12 मार्च 2017
|
मनुष्यबळ विकासमंत्री मा. प्रकाश जावडेकरजी यांच्याशी डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी पुणे मेट्रो स्टेशनचे डिझाईन्स, रूट विस्तार आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
|
27 फेब्रु. 2017
|
प्रकल्पासाठी प्रथम निविदा उपलब्ध करण्यात आले आहे. हे 10.75 किलोमीटरच्या रूटविस्तारासाठी पिंपरी-चिंचवड ते रेंज हिलपर्यंत आहेत.
|
20 फेब्रु. 2017
|
भूमी सर्वेक्षणाचे ५१% कार्य पूर्ण
|
03 फेब्रु. 2017
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठीच्या मालिकेतील २ रा मेट्रो-संवाद आयोजित
|
25 जाने. 2017
|
पुणे मेट्रोच्या विकास कामावरील आढावा घेणारी पत्रकार परिषद महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दीक्षित यांनी संबोधित केली
|
23 जाने. 2017
|
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) ची स्थापना 50:50 भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.
|
21 जाने. 2017
|
पुणे मेट्रोच्या माहीती आणि जनजागृतीसाठीच्या मालिकेतील पहिला मेट्रो-संवाद आयोजित
|
19 जाने. 2017
|
१.७ किमी. च्या नदीवरील महामेट्रोच्या बांधकामाबाबतच्या NGT ऑर्डरवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे.
|
08 जाने. 2017
|
तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमने पुणे मेट्रो मार्गांचे पुनरावलोकन केले.
|
29 डिसें. 2016
|
कोरेगाव पार्क रोडवरील महामेट्रोच्या नव्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. वेबसाईट आणि सोशल मीडियावर सुरु करण्यात आलेल्या मेट्रोच्या नव्या माध्यमांबद्दल मा. ब्रिजेश दीक्षित यांनी माहिती दिली. तसेच जिओ-टेक्निकल परीक्षणाच्या निष्कर्षाचे स्पष्टीकरण दिले.
|
29 डिसें. 2016
|
पुणे मेट्रो कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत भाजपचे मंत्री श्री गिरीश बापट, महा मेट्रो व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दीक्षित आणि श्री रामनाथ उपस्थित होते
|
25 डिसें. 2016
|
माती परीक्षण आणि स्थलाकृतिक सर्वेक्षण सुरू
|
24 डिसें. 2016
|
भूमी सर्वेक्षण दुसऱ्या दिवशीही चालू राहिले आणि भूमिपूजनाचा ऐतिहासिक कार्यक्रम घेण्यात आला (यूट्यूब किंवा ट्विटरचा दुवा तपासावा).
|
23 डिसें. 2016
|
श्री ब्रिजेश दीक्षित यांनी पुणे मेट्रो चमू समवेत दोन्ही कॉरिडॉरच्या विविध मार्गांचे अवलोकन केले
|
16 डिसें. 2016
|
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दीक्षित यांचे शहरात आगमन झाले. पुणे महानगर पालिकेचे आयुक्त यांच्या समवेत संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले
|
12 डिसें. 2016
|
कार्यालयासाठी आर्किटेक्चर चमूचे कार्य पूर्ण. कास्टिंग यार्डसाठी भूमी सर्वेक्षणास सुरुवात
|
10 डिसें. 2016
|
डीपीआरचे अवलोकन करण्यासाठी एनएमआरसीएलच्या प्रकल्प संचालकाने एक टीम तयार करून पुढील कामाचे निर्देशन दिले
|
09 डिसें. 2016
|
एनएमआरसीएल, नागपूर शहरातील पाच वरिष्ठ मंडळींची टीम पुणे शहरामध्ये पोहचली. ऑफिसचे स्थान निश्चित करण्यात आले आणि भूमिपूजनाचा तारीख 24 डिसेंबर ठरविण्यात आली.
|
08 डिसें. 2016
|
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाच्या अध्यक्षांनी पुणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली
|