महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक व ऐतिहासिक राजधानी पुणे, ज्याला त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यामुळे आणि समृद्ध नैसर्गिक संसाधनामुळे दख्खनची राणी म्हणून ओळखले जाते.
संत तुकाराम यांचे जन्मस्थान,‘ हिंदवी स्वराज्या’ची स्थापना करणारे महान योद्धा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी, समाजसुधारक ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीची मशाल चेतविणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले यांची कर्मभूमी.
पुणे शहर जगाच्या नकाशावर तिच्या शैक्षणिक, संशोधन आणि विकास संस्था, आय.टी. पार्कस् आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल उद्योगांमुळे ओळखले जाते.
गेल्या काही दशकांत शहराची लोकसंख्या वाढली. देशाच्या विविध भागांतील लोकं रोजगाराच्या संधीमुळे पुण्यात स्थलांतरित झाले. परंतु, नागरिकांना मिळणाऱ्या निरंतर आणि शाश्वत पायाभूत सुविधांचा या शहरात अभाव होता. पुण्यातील नागरिकांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून प्रवासात जाणारा सरासरी वेळ हा १०० मिनिटांच्या वर आहे. या कारणामुळे अधिकाधिक नागरिक स्वत:च्या वाहनांचा उपयोग करू लागले. यामुळे शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. अपघाताचे प्रमाण वाढले.
आता येथे, पुणे मेट्रो या प्रश्नावर तोडगा काढण्यास मदत करेल. पुणे मेट्रो आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास देऊन नागरिकांचा प्रवासाचा वेळ ७५ टक्क्याने कमी करेल. शहरातील युवा, विद्यार्थी, व्यवसायी आणि नोकरदार आदींसाठी त्यांच्या गंतव्य ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाची सोय उपलब्ध करून देईल.
मेट्रो रेल्वे भविष्यात स्मार्ट सिटी प्रकल्पातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या पाठीचा कणा बनेल आणि प्रकल्पातील विविध मापदंडांना बळकट करेल :